नगरसेवक संदीप वाघेरे यांनी लोहगड येथे त्रबकेश्वर महादेव मंदीरा मध्ये केला रुद्राभिषेक

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- विश्व हिंदू परिषद,बजरंग दल व संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने किल्ले लोहगडवरील श्री त्रबकेश्वर महादेव मंदीरा मध्ये कार्यक्षम नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला.सदर कार्यक्रमास 500 भाविक उपस्थीत होते.कार्यक्रमाचे वेळी संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने महप्रसदचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या निमीत्त डॉ.प्रमोद बोराडे यांनी व्याख्यान व मार्गदर्शन केले कार्यक्रमस हरीष वाघेरे,संदेश भेगडे,कुणाल साठे,राजेंद्र वाघेरे,जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातूर्डेकर,अमित कुदळे उपस्थीत होते.

Review