तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर माझ्याविरोधात खटला दाखल करा;दिग्विजय सिंहांचे मोदीसरकारला आव्हान
नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन) – पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख ‘दुर्घटना’ केल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह नव्या वादात सापडले आहेत. यामुळे त्यांच्यावर चहुबाजूनी टीका होत असून भाजपकडूनही दिग्विजय यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, याउलट आता दिग्विजय सिंह यांनी मोदी सरकारला खटला दाखल करण्याचे आव्हान दिले आहे.
दिग्विजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हंटले की, मी केलेल्या ट्विटवरून तुम्ही (भाजप) आणि तुमचे मंत्री माझ्यावर पाकिस्तान समर्थक आणि देशद्रोही असल्याचा आरोप करत आहेत. वादग्रस्त ट्विट मी दिल्लीतून केले होते. दिल्ली पोलीस केंद्र सरकारच्या अंतर्गत येते. जर तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर माझ्याविरोधात खटला दाखल करा, असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे.