रहाटणी: सराफ दुकानदारावर गोळीबार;चोरट्यांनी साडेतीन किलो सोन्याचे दागिने लुटले
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)–रहाटणी येथील एका सराफ व्यावसायिकावर गोळीबार झाला. ही घटना आज (बुधवारी) दुपारी एकच्या सुमारास कोकणे चौक येथे घडली. यामध्ये व्यावसायिकाच्या पायाला गोळी लागली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे.
दिव्यांग प्रदीप मेहता (वय २४ रा. रहाटणी) असे जखमी झालेल्या सराफाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास चार चोरटे दुकानात आले. त्यांनी दुकानाचे शटर आतून लावून घेतले. आतमध्ये असलेल्या दिव्यांग यांच्या पायावर गोळी मारत दुकानातील सोन्या चांदीचे दागिने लुटून नेले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत.