नदीपात्रातील जलपर्णी न काढल्यास चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)-नदीपात्रातील जलपर्णीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून. डासांमुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नदीपात्रशेजारी राहणारे तसेच परिसरात फिरणारे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.असे असताना प्रशासनाकडून यावर कुठलीही दखल घेतली नाही.यामुळे चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरी चिंचवड मधील नदीपात्रातील जलपर्णी त्वरित काढावी व नागरिकांना या डासांच्या त्रासातून मुक्त करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे.
या प्रसंगी युवक काँग्रेसचे सरचिटणीस चंद्रशेखर जाधव, चिंचवड विधानसभा सरचिटणीस शैलेश अनंतराव, आशिष गालफडे, प्रेम शर्मा आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड मधील नदीपात्रात जलपर्णी ने विळखा घातलाआहे,रावेत, वाल्हेकरवाडी, केजुबाई बंधारा, थेरगाव, काळेवाडी, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव यासर्वच ठिकाणी जलपर्णी वाढली आहे. याकडे महापालिकेच्या वतीने सातत्याने दुर्लक्ष केले जाते , याचा निषेध म्हणून चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचा वतीने आज ब प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग अधिकारी व आरोग्य अधिकारी यांना जलपर्णी चा पुष्पगुच्छ देऊन निवेदन देण्यात आले,