जम्मू-काश्मीरमध्ये बसवर ग्रेनेड हल्ला फेकणाऱ्याला अटक-डीजीपी दिलबाग सिंग यांची माहिती
श्रीनगर,(सह्याद्री बुलेटीन)- आज सकाळी जम्मू बस स्थानकाजवळ बसच्या दिशेने एका अज्ञाताने ग्रेनेड फेकल्याने मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात बसस्थानकाच्या आवारातील 28 नागरिक गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
दरम्यान आताच हाती आलेल्या वृत्तानुसार जम्मू आणि काश्मीरचे पोलीस प्रमुख दिलबाग सिंग यांनी आज सकाळी ग्रेनेड फेकून हा स्फोट घडवून आणणाऱ्या इसमास पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती दिली आहे.
आज सकाळी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाने परिसरला घेरा घातला होता.