उद्या कल्याण दिवा मार्गावर मेगाब्लॉक
मुंबई,(सह्याद्री बुलेटीन)-रविवार 10 मार्च रोजी मध्य रेल्वेवर कल्याण दिवा अप मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.15 वाजल्यापासून ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. तर हार्बरवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 वा. पासून दुपारी 4.10 वा. पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
