‘जागतिक महिला दिनानिमित्त ’ महात्मा फुले महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन

प्रविण डोळस

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन) “समाजात स्वत:चे स्थान निर्माण करावयाचे असेल तर संधी आपणच शोधली पाहिजे, स्वत:चे अस्तित्व आपणच टिकवले पाहिजे, प्रसन्न मनाने ‘स्त्रीपण’, ‘आईपण’ व ‘बाईपण’ जपलं पाहिजे. मातृत्वाचा सन्मान करता तसाच पत्नीत्वाचाही सन्मान करा असे उद्गार माळेगाव (मावळ) येथील सेवाश्रम आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रमिला भालके यांनी काढले. त्या येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात, जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानमालेत बोलत होत्या.

दुसर्याय व्याख्यानात प्रा. शीला गायकवाड म्हणाल्या, “आजची स्त्री सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे सक्षम बनली आहे. महिला दिन साजरा करण्यापेक्षा महिलांसोबत होणार्याब अन्याय, अत्याचारांविरुद्ध संघर्ष करणे गरजेचे आहे. महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहिले व त्याचबरोबर कुटुंब व्यवस्था जपली पाहिजे”


आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले,”प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. जीवनाच्या चढ-उतारामध्ये पती-पत्नीची एकमेकांना साथ असली पाहिजे.


व्याख्यानमालेचा प्रारंभ प्रतिमापूजनाने करण्यात आला. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक कला विभागाच्या उपप्राचार्या मृणालिनी शेखर यांनी केले व प्रा. डॉ. हेमलता कारकर यांनी आभार मानले प्रा. डॉ. सोनल बावकर यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान डॉ. हेमलता कारकर, डॉ. प्रफुल्लता राजमाने, प्रा सुषमा खोपकर, डॉ. कामायनी सुर्वे, सौ. अनुराधा धाराशिवकर, सौ. निर्मला केदारी व श्रीमती आशालता काकडे या महिलांचा पाहुण्यांच्या हस्ते प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. डॉ. सोनल बावकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या संजीवनी पाटील, कार्यालयीन अधीक्षक श्री. राजेंद्र मेचकर व महाविद्यालयातील सर्व महिला वर्ग व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे संयोजन महिला मंचच्या सर्व सभासदांनी
महात्मा फुले महाविद्यालयात अभिनव उपक्रमांनी महिला दिन साजरा करण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्त महाविद्यालयातील सर्व महिला वर्गात स्वत:च्या हस्ताक्षर संदेश लिहिण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण सेवानिवृत्त प्रा. अलका चव्हाण व सेवानिवृत्त उपप्राचार्या डॉ. जयश्री मगदूम यांनी केले. त्यामध्ये सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. त्यामध्ये प्रा. सुषमा खोपकर, प्रा. मृणालिनी शेखर व प्रा. शर्मिला भांबारे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे संयोजन प्रा. सुषमा खोपकर व प्रा. शहाजी मोरे यांनी केले.
त्यानंतर प्रा. प्रिती नेवसे यांनी ‘माहिती तंत्रज्ञान’ या विषयावर सर्व महिलांना मार्गदर्शनपर व्याख्यान दिले.

Review