गोगादेवांच्या परमभक्ताला मिळाले चाळीस वर्षाच्या तपश्चर्येचे फळ... कविराज संघेलिया यांचा समाज भूषण पुरस्काराने गौरव

पुणे,( सह्याद्री बुलेटीन)- कविराज संघेलिया यांच्या चाळीस वर्षाच्या निष्कलंक आणि निस्वार्थी समाजसेवेची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

कविराज मागील 40 वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन समाजसेवा करत आहेत. मेहतर वाल्मिकी समाज्यामध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार करण्यासाठी विद्यार्थी सेवा संघात विश्वस्त म्हणूनही ते कार्यरत आहेत, तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतही त्यांनी भाग घेतला आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणं हे त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे.
वाल्मिकी समाजामध्ये महिलांमध्ये पदर घेण्याची रूढी परंपरा आहे त्याला त्यांनी विरोध दर्शवून, ही पद्धत बंद करण्यासाठी जनजागृती अभियानही छेडले.
स्वतः व्यसनमुक्त राहून समाजालाही व्यसनमुक्त करण्यासाठी ते कायम प्रयत्ननाशील असतात.
संकल्प प्रतिष्ठान संस्थेची स्थापना करून कविराज हे गरजू विद्यार्थ्यांना फंडाचे वितरण करून शिक्षणातही आपले योगदान देत आहेत.

भगवान गोगा देवांचे महात्मा गांधी मार्गावर भव्य देऊळ उभारण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
पर्यावरण समतोल राहण्यासाठी हजारो वृक्ष पुणे शहर व जिल्ह्यात वृक्षारोपण कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी लावले आहेत.
पारंपरिक व्यवसायांना फाटा देऊन त्यांनी व्यावसायिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे.
कविराज संघेलिया यांच्या याच कार्याची दाखल महाराष्ट्र शासनाने घेऊन त्यांचा उचित सन्मान केला आहे यामुळे समाजातील विविध स्तरातून आनंद व्यक्त होत आहे.

Review