महिलांनी हक्क अधिकारासाठी जागृत व्हावे -अॅड रुक्मीणीताई सोनकांबळे
सिध्दार्थ सूर्यवंशी (वार्ताहर)
जळकोट,(सह्याद्री बुलेटीन) दिः ८ मार्च रोजी संदेश अॅकाडमी जळकोट येथे " कासा संस्था जळकोट व ग्रामीण विकास कार्यकर्ता प्रतिष्ठाण जळकोटच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्य महिला महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड रुक्मीणीताई सोनकांबळे यांनी महिलांच्या हक्क अधिकार व घर शेती संयुक्त नांवे नोंदवणे गरजेचे आहे .महिला जागृत झाल्या पाहीजेत सामाजीक ,आर्थिक संस्कृतीक धार्मिक व राजकिय प्रश्नावर सध्या स्थिती काय आहे व महिलाचा विकास झाला पाहीजे महिलांसाठी असलेले कायदे व योजना इत्यादीवर सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रसंगी विलास सिंदगीकर सुप्रसिद्ध साहित्यिक व विद्यासागर डोरनाळीकर, प्रा.चंद्रकांत मोरे,पटेल साहेब पोलीस निरिक्षक जळकोट यांनी महिला विषयक स्वाभिमान व माहिलांनीच सर्व अधिकार गाजवावे महिलाच्या हातात सत्ता आली पाहीजे. महिला आहे तर सर्व काही आहे.अशा प्रकारे सविस्तर रूढी परंपरा या वर मात, करून आधुनिकीकरण होऊन महीलांनी पुढे गेला पाहीजे. राष्ट्रमाता जिजाऊ ,सावित्रिबाई फुले माता रमाई,आहील्याबाई होळकर, मुक्ता साळवे, इंदिरा गांधी, मदर तेरेसा, कल्पना चावला, सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याचा उजाळा करण्यात आला यात काही चिमुकल्यानी पण मनोगत व्यक्त केले.
प्रसंगी मंचावर सौ शितल गोस्वामी उमेद पं .स. जळकोट मुंडे मॅडम प .स जळकोट सौ सुनिताताई ढवळे संचालिका संदेश अॅकाडमी ,सौ गडकर संचालिका दिव्याश अॅकाडमी व माधव कांबळे, अध्यक्ष प्रतिष्ठाण व मारोती गुंडीले, लक्ष्मण रणदिवे देवणीकर उपस्थित होते कार्यकृमाचे प्रस्ताविक कासा समन्वयक व्ही बी डावकरे व प्रतिष्ठाण सचिव बालाजी गुडसुरे यांनी केले सूत्रसंचलन सुजाता वाघमारे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कासाचे पृबोधक मारोती सुर्यवंशी प्रतिष्ठाण उपाध्यक्ष शारदाताई मुंगे कोषाध्यक्ष दशरथ सोनकांबळे अनिल काळे नामदेव काकरे सुरेश सुर्यवंशी उद्धव गोटमुकले नामदेव गोतावळे संताताई भाले रमाताई वाघमारे मारोती अंधोरे संतोष वाघमारे राजु वाघमारे सुप्रिया गायकवाड सतिष वाघमारे गंगाराम गडकर लक्ष्मीबाई पवार रंजना तोगरे व संदेश अॅकाडमी जळकोट येथिल संचालक ढवळे व सर्व विद्यार्थी व प्रतिष्ठाणचे सर्व सदस्य यांनी मदत केले व मेळावा संपन्न झाला या महिला महामेळाव्याला जळकोट तालुक्यातुन मोठया प्रमाणात महिलांनी व पुरुषांनी उपस्तिथी राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.