मतदार प्रबोधनासाठी थेरगाव येथे अपर्णाताई रामतीर्थकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन

पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) - देशहिताचे भान ठेऊन १०० % मतदान झाले पाहिजे यासाठी मतदार जागृती करण्यासाठी कृपासिंधू महिला मंच आणि प्रबोधन मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ऍड. अपर्णाताई रामतीर्थकर यांच्या व्याख्यानाचे थेरगाव येथे आयोजन करण्यात आले आहे.
"आजची स्त्री,जागतिकीकरण, सुजाण स्त्रीत्वाचा आयाम" या विषयावर अपर्णाताई बोलणार असून यावेळी PSI कविता रुपनर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्तित राहणार आहेत. हा कार्यक्रम मोरया मंगल कार्यालय, थेरगाव येथे रविवारी दि. १७ मार्च रोजी साय.४ ते ७ वाजता होणार आहे. अशी माहिती प्रबोधन मंचाचे प्रमुख माधव खोत, समन्वयक योगेश सासवडे, आणि महिला विभाग प्रमुख सुवर्णा भोईने यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
देशात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. भारताला बलसागर बनवण्यासाठी हि निवडणूक महत्वाची आहे, यासाठी १००% मतदान झाले पाहिज या भावनेतून मतदार जागृती मोहीम प्रबोधन मंचाच्या माध्यमातून राबवली जाते आहे, याच मोहिमेसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्वांनी उपस्तित राहून सहकार्य करावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Review