मला माहित आहे तुम्ही काय विचारणार आहे,असं म्हणत पार्थ पवार माध्यमांशी बोलणं टाळलं
पुणे,(सह्याद्री बुलेटीन)-मला माहित आहे तुम्ही काय विचारणार आहे, असं म्हणत पार्थ पवार यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं आहे. पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ मधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु केला असून त्यांनी आज पिंपरी चिंचवड येथील कार्यकर्ता मेळाव्यात संवाद साधला.
पत्रकार कोणते प्रश्न विचारणार याचा अंदाज आल्यानं पार्थ पवार यांनी माध्यमांशी बोलणं टाळल्याच्या चर्चा सुरु आहेत.
दरम्यान, पार्थ पवार यांनी मावळ मधून लोकसभा निवडणूक लढवावी म्हणून शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली मात्र शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं होतं.