मी एकटाच नाही, देशात आणखीही 'चौकीदार' आहेत - पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ केला शेअर...

नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन)-पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आपण देशाचे चौकीदार असल्याचे म्हटले आहे. तसेच मी एकटाच नाही तर देशात माझ्यासह आणखीही चौकीदार असल्याचे मोदींनी म्हटलं आहे. मोदींनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. याच व्हिडीओमध्ये त्यांनी देशातील जनतेला संबोधित करताना, 'तुमचा चौकीदार मजबूतपणे उभा असून देशाची सेवा करत आहे', असे म्हटले आहे.

Narendra Modi
 
@narendramodi
 
 

Your Chowkidar is standing firm & serving the nation.

But, I am not alone.

Everyone who is fighting corruption, dirt, social evils is a Chowkidar.

Everyone working hard for the progress of India is a Chowkidar.

Today, every Indian is saying-

 
40.4K people are talking about this
 

पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं की, मी एकटाच नाही तर जो व्यक्ती भ्रष्टाचाराविरोधात उभा राहिल, स्वच्छता आणि समाजात घडणाऱ्या वाईट घटनांविरोधात लढले तो चौकीदार आहे. देशाच्या प्रगतीसाठी काम करणारा प्रत्येक व्यक्ती चौकीदार आहे. आज प्रत्येक हिंदुस्थानी नागरिक बोलतोय मी चौकीदार आहे.

मोदींनी जो व्हिडीओ शेअर केला आहे त्यामध्ये देशातील विविध राज्यातील लोकं दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये मोदी सरकारने राबवलेल्या योजना आणि साध्य केलेल्या लक्ष्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

Review