MPSC :परीक्षेत महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थी सागर खाडे राज्यात प्रथम

प्रविण डोळस

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थी सागर खाडे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) 2017 मध्ये घेण्यात आलेल्या.पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत महाराष्ट्रातून एन.टी.डी.प्रवर्गातून प्रथम येणाच्या मान मिळवला.

त्याने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पांडुरंग गायकवाड यांच्या हस्ते सागर खाडे आणि त्याच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला.प्रसंगी महाविद्यालयाचे स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख प्रा.संदीप शिंदे,आणि प्रा.विलास कुमावत यांनी मार्गदर्शन करत त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Review