
मनोहर पर्रिकरांना अखेरची सलामी
गोवा,(सह्याद्री बुलेटीन)-कला अकादमीमध्ये पर्रिकरांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जमली आहे. अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याला रवाना झाले असून मनोहर पर्रिकरांच्या अंतयात्रेत ते सामील होणार आहेत. मनोहर पर्रिकरांच्या निधनाने देशभरात शोकाकुल वातावरण पसरले आहे. मनोहर पर्रिकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी गोव्यातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली आहे. संध्याकाळी ५ वाजता गोव्यातील मिरामार येथे मनोहर पर्रिकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.