रोटरी क्लब ऑफ पुणे कॉस्मोपॉलिटन तर्फे महिला दिनानिमित्त आशा भट्ट यांना सन्मानपत्र देऊन गौरव

पुणे,(सह्याद्री बुलेटीन)- जागतिक महिला दिनानिमित्त, आशा भट्ट या मंथन फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा आहेत. तसेच माहिती सेवा समितीच्या पुणे जिल्हा अध्यक्ष तसेच रिलीफ फाउंडेशन च्या व्यवस्थापिका आहेत. मंथन फाउंडेशन ही HIV/एड्स, गुप्तरोग जनजागृती चे काम देह विक्रय करणाऱ्या महिला, स्थलांतरित कामगार, तृतीयपंथी यांच्या साठी गेले चार वर्षांपासून करीत आहे. सदर कामाच्या माध्यमातून संस्था दोन लाख स्थलांतरित कामगारांसाठी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून पोहचली आहे, तसेच एक मार्च पासून महिला उद्योजक तयार करण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन्स सामाजिक उद्योजकता सुरू केले आहे.

सन्मानपत्र डिफेन्स मधील तूहिन काकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. उपस्थित मान्यवर सचिन कुलकर्णी अध्यक्ष रोटरी, जितेंद्र हुडे सचिव, डॉ. रवींद्र नलावडे, माधवी भट्ट, निरंजन वेलणकर, आयुष कापडी, अद्विका वेलणकर, सत्यजित उमर्जिकर, अनुपमा नलावडे, तुहिन काकर, मंथन फाउंडेशन चे विश्वस्त राजेंद्र पवार, योगेश निकम, अनिता चव्हाण आदी उपस्थित होते.
रोटरी विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करते.

Review