२०मार्च -चवदार तळे सत्याग्रह महाड आणि समता सैनिक दल ९२ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध ठिकाणी पाणी प्रश्नाचा- जन संवाद

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन) २० मार्च - चवदार तळे सत्याग्रह महाड, व समता सैनिक दल ९२ व्या वर्धापन दिनानिमित्त पिं. चि. मधील विविध ठिकाणी पाण्याचा प्रश्नाचा - जन संवाद आयोजीत करण्यात आला होता. शगुन चौक पिंपरी,चिंचवड पेट्रोल पंप,चाफेकर चौक चिंचवड गाव मंडई,YCM हाॅस्पिटल,दवा बाजार चिंचवड स्टेशन,कुदळवाडी पोलिस चौकी अशा विविध रहदारीच्या ठिकाणी शासकीय पानपोई असायला पाहिजे कि नाही Y / N व सही मोहीम घेवुन सरबत वाटप करन्यात आले.

या वेळी फेसबुक लाईव्ह च्या माध्यामातून जनतेशी संवाद साधण्यात आला. पाण्याच्या योग्य वापरा बाबत प्रबोधन करन्यात आले, तसेच भारताता कधीच दुष्काळ पडणार नाही अशा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जलनिती बाबत जनतेला बॅनर द्वारे माहिती देन्यात आली.

जनतेची मागणी त्यांच्या सहीनीशी निवेदनाद्वारे पिं.चि. आयुक्त व महापौरांना देन्यात येणार आहे.
लुंम्बिनी बुद्ध प्रतिष्ठान, शास्त्री नगर,डिलेक्स चौक,अजिंक्य स्पोर्टस् क्लब,वेताळनगर,चिंचवडगाव.विश्वशांती बुद्ध विहार सेवासंघ, महात्माफुले नगर भोसरी MIDC,सम्यक बुद्ध विहार, N.G ग्रुप आनंद नगर चिंचवड,भिम गर्जना मित्र मंडळ,आनंदनगर चिंचवड. पंचशिल फाऊंडेशन जाधववाडी चिखली. या उपक्रमात सर्व मंडळे सहभागी झाले होते.

 

 

 

Review