अं. नि. स.च्या वतीने डॉ .चौधरी यांच्या व्याख्यानाचे चिंचवड येथे आयोजन

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन) दि.३० मार्च २०१९ रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,पिंपरी चिंचवड शाखा यांचे तर्फे डॉ स्वप्नील चौधरी,आयुर्वेद कॉलेज निगडी यांचे देहदान व अवयवदान - माहिती व जागृती याविषयी या विषयावर व्याख्यान बिजलीनगर ,चिंचवडे हॉल येथे झाले.

अध्यक्षस्थानी ॲड. मनीषा महाजन या होत्या. तसेच पिंपरी चिंचवड मधील आधार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रदीप कदम यांचा व ज्या कुटुंबातील व्यक्तीचे देहदान किंवा अवयवदान केले आहे अश्या कुटुंबातील श्री अर्जुन हुंडारे, मनीषा महाजन,व रवींद्र बोर्लीकर यांचा सत्कार करण्यात आला. या नंतर अंनिसचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. राजेंद्र कांकरिया सर यांनी देहदान व नेत्रदान याबाबतची भूमिका मांड्ताना २० - २५ वर्षांपूर्वी या विषयी केलेल्या कामाचे विविध अनुभव सांगितले.

प्रमुख वक्ते डॉ. स्वप्नील चौधरी यांनी त्यांच्या वैद्यकीय शिक्षणात वाय सी एम व इतर हॉस्पिटल मधील ब्रेन डेड रुग्णांच्या उपचारातीलअनुभव आणी अज्ञान व अंधश्रद्देतून पेशन्टकडून देहदान व अवयवदान यास न मिळणारा प्रतिसाद याविषयाच्या जागृतीची आवश्यकता सांगताना दर वर्षी ८० लाख मृत्यू मागे १लाख देखील देहदान व अवयवदान होऊ शकत नसल्याची खंत व्यक्त करून शासकीय व मेडिकल असोसिएशन द्वारा आधुनिक तंत्राद्वारे एक वैशिष्ट्य पूर्णतंत्रज्ञानाने हृदय,किडनी,लिव्हर ,त्वचा दान हॉस्पिटलमध्ये मृत्यू वा ब्रेन डेड पेशन्टचे करता येते त्यासाठी पेशण्टच्या नातेवाईकांनी योग्यवेळी व लवकर निर्णय घेतल्यास ग्रीन कॉरीडाँर तयार करून योग्य व्यक्तीं पर्यन्त अवयव पोहचून लहान तरुण वयातील पेशंटला जिवनदान देता येते. यासर्व बाबतीतील बारकाव्यांसह संपूर्णमाहिती डॉ स्वप्नील चौधरी यांनी अभ्यासपूर्ण शैलीतून सांगितली व श्रोत्यांच्या शंका दूर केल्या.

अध्यक्षीय भाषणात अॅड. मनीषा महाजन यांनी स्वताचे अनुभव मांडत अंनिस च्या भूमिकेची मांडणीकरून परिस्थिती बदलाची गरज व्यक्त केली. या कार्यक्रमांचे सुत्र संचलन अंजली इंगळे यांनी केले.तर,विजय सुर्वे यांनी परीचय करून दिला.तसेच बोर्लीकर यांनी स्व कुटुंबाचा दाखला देऊन सगळ्यांचे आभार व्यक्त केले. ''हम होंगे कामयाब '' गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Review