भारताची 'मिशन शक्ती' मोहीम 'अतिशय भयानक'- यामुळे अंतराळ स्थानकाला नवीन धोका
नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन)-दि. २७ मार्चला भारताने अंतराळातील कृत्रीम उपग्रह पाडमार्या क्षेपणास्त्राची 'ए सॅट' ची यशस्वी चाचणी भारताने केली. या यशस्वी चाचणीचे सर्वत्र कौतूकही झाले. मात्र याबाबत अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने (नासा) भिती व्यक्त केली आहे. नासाने भारताची ही मोहीम 'अतिशय भयानक' आहे. पाडलेल्या उपग्रहाचे ४०० तुकडे अंतराळात पसरले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) अंतराळवीरांना नवीन धोका निर्माण झाला आहे, असं नासाने म्हटलं आहे.
'ए-सॅट'ने सुमारे तीनशे किलोमीटर अंतरावरील उपग्रह अवघ्या तीन मिनिटांत टिपला. या मोहिमेनंतर भारत शत्रू राष्ट्राचा उपग्रह पाडण्याची क्षमता असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर जगातील चौथा देश बनला. मात्र या मोहिमेनंतर नासाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. नासाचे प्रशासक जिम ब्रिडेनस्टाइन यांनी ही भीती व्यक्त केली. जिम ब्रिडेनस्टाइन म्हणाले की, भारताने पाडलेल्या उपग्रहाचे तुकडे एवढे मोठे नाही की त्यांना ट्रॅक करता येईल. आतापर्यंत १० सेंटीमिटरपेक्षा मोठे ६० तुकडे मिळाले आहेत. भारताने लो अर्थ ऑर्बिटमधील ३०० किलोमीटरवरील उपग्रह पाडला. ही चाचणी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासह अंतराळ कक्षेत असलेल्या सर्व उपग्रहांच्या खाली घेण्यात आली. मात्र, या चाचणीनंतर पाडलेल्या उपग्रहाचे २४ तुकडे अंतराळ स्थानकाच्या वरच्या बाजून पोहचले आहेत. हे खूप धोक्याचे आहे.
अंतराळात 23 हजार अवशेषांचे तुकडे
अवकाषात सध्या 23 हजार अवशेषांचे तुकडे आहेत. त्यांचा आकार 10 सेंटीमिटरपेक्षा मोठा आहे. या तुकड्यांवर सध्या अमेरिकेचे लष्कर लक्ष ठेऊन आहे. यातील 3 हजार तुकडे हे चीनने 2007 मध्ये 530 माईल्सवरील पाडलेल्या उपग्रह चाचणीमुळे तयार झाले आहेत. भारताने केलेल्या चाचणीमुळे हे तुकडे अंतराळ स्थानकाला धडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. असे नासाचे म्हणणे आहे. या अवषेशांनी वातावरणात प्रवेश केला तर धोका कमी होणार आहे.