सॉरी चौकीदार - राहुल गांधींकडून सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली

दिल्ली ( सह्याद्री बुलेटिन ) - निवडणुकीच्या वातावरणात मी आवेशात विधान केले होते आणि विरोधकांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला, असे म्हणत राफेल प्रकरणात फेरविचार याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली आहे.

आपल्या निर्णयात ‘चौकीदार चोर है’ असे कुठेही म्हटलेले नसल्याचे नमूद करत न्यायालयाने अवमान याचिकेवर राहुल यांना नोटीस बजावली. या प्रकरणी भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. या नोटीशीवर राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली.

मी १० एप्रिल रोजी राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल वाचला नव्हता. नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करताना निवडणुकीच्या वातावरणात आवेशात विधान केले होते आणि राजकीय विरोधकांनी त्या विधानाचा विपर्यास करत गैरसमज पसरवले. असे गांधी यांनी सांगितले.

 

Review