दगडूशेठ गणपतीला पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य पुष्टिपती विनायक जयंतीनिमीत्त दाखवण्यात आला.
दुष्काळाचं सावट दूर होऊ दे, पाण्याचं दुर्भिक्ष कमी होऊ दे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात,यासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
शनिवारी सूर्योदयाच्या वेळी सकाळी सहा वाजून पाच मिनीटांनी गणेशजन्म सोहळा पार पडला. या सोहोळ्यापूर्वी पहाटे पं. शौनक अभिषेक यांनी स्वराभिषेकाच्या माध्यमातून गायनसेवा अर्पण केली.

Review