पुनाळेकर, भावे यांना सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश...

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपींकडून बाजू मांडणारे अ‍ॅड. पुनाळेकर आणि त्यांच्याकडे कामाला असलेला लिपिक भावे याला शनिवारी सीबीआयने अटक केली. त्यानंतर त्यांना सीबीआयच्या पथकाने रविवारी दुपारी पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. अ‍ॅड. पुनाळेकर यांनी न्यायालयात स्वत: बाजू मांडून या प्रकरणात सीबीआय मला गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. अ‍ॅड. पुनाळेकर आणि भावे यांच्यावतीने अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी बाजू मांडली. सीबीआयकडून करण्यात आलेली कारवाई चुकीची आहे, असे त्यांनी युक्तिवादात नमूद केले. बचाव पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेले मुद्दे सीबीआयचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी खोडून काढले. या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने दोघांना सीबीआय कोठडी देण्याची विनंती अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी केली. दरम्यान, अ‍ॅड. पुनाळेकर यांनी नवी मुंबईतील सीबीआयच्या कार्यालयात वकिलांची भेट घेण्यास परवानगी मिळावी, असा अर्ज न्यायालयात सादर केला. अ‍ॅड. पुनाळेकर यांच्या वतीने अ‍ॅड. इचलकरंजीकर आणि अ‍ॅड. धर्मराज चंदेल यांनी न्यायालयात दाखल केलेला अर्ज मंजूर करण्यात आला.

Review