मी सुद्धा मंत्री होणार - रामदास आठवले

विद्यमान मंत्रिमंडळातील मंत्री रामदास आठवले यांना शपथविधीसाठी निमंत्रण आलेले नाही परंतु त्यांचा मंत्रिमंडळात समावेश असेल अशी त्यांना खात्री आहे. मला अमित शाह यांचा फोन आलेला नाही, पण तो येईल अशी खात्री आहे. दलित आणि अल्पसंख्याकांची मते मिळाली पाहिजेत यासाठी महाराष्ट्रात आणि देशात मी प्रयत्न केला होता. मला दिलेल्या खात्याची जबाबदारी मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे. यामुळे मी पुन्हा मंत्री होणार असे रामदास आठवले म्हणाले.

Review