काँग्रेस पार्टीतील गूढ कायम, आता राहुल गांधींचे काय ?
संसदीय पक्षाच्या नेतेपदी सोनिया गांधी यांचीच पुन्हा एकमताने निवड करण्यात आलीय. पण राहुल गांधी यांच्या राजीनाम्या बाबत काय हे गूढ कायम असून आता पुन्हा नव्याने कशी सुरुवात करणार हा प्रश्न काँग्रेस पुढे आहे,
काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झाली.
काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत पक्षाचा लोकसभेतील गटनेता निवडला जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु, त्यासंबंधीचे सर्वाधिकार सोनिया गांधी यांना देण्यात आले आहेत. राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचं काय, याबद्दलचा सस्पेन्सही अद्याप कायम आहे.