विरोधी पक्षनेत्याशिवायच पावसाळी अधिवेशन ?
पावसाळी अधिवेशन १७ तारखेला सुरु होणार आहे. मात्र हे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवायच होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नेमणूक कधी करायची याचा निर्णय आता सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांवर अवलंबून आहे.
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत शक्यता वर्तवली आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असे ते म्हणाले आहेत.