पुण्याचे पालकमंत्री कोण होणार ? राजकीय चर्चेला उधाण...

गिरीश बापट पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत त्यामुळे रिक्त झालेल्या पालकमंत्री पदावर आता कोण? या विषयावर आता राजकीय उधाण आले आहे. बापट हे कसबा विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा विजयी झालेले आहेत, २०१४ मध्ये राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारमध्ये त्याच्याकडे पुणे पालकमंत्री तसेच अन्न, औषध, प्रशासन आणि संसदीय कार्य ही मंत्रिपदे आहेत. लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर बापट यांना राज्यातील मंत्रीपदासह पालकमंत्रीपद सोडावे लागणार हे निश्चित होते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, चिंचवडचे आ लक्ष्मण जगताप, आ माधुरी मिसाळ यांची नावे पालकमंत्री पदासाठी आघडीवर आहेत.

Review