तुमको ना भूल पायेंगे - खैरे यांना पराभवाची सल कायम
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना लोकसभा निवडणुकीतील प्रभावाची सल कायम असून शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या बाबतच्या तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या
ते म्हणाले, गेली २० वर्ष मी संभाजीनगरचा खासदार होतो. लोकांची कुठलीही कामे मी तत्परतेने केली. माझं स्वतःचं घरही मी बांधलं नाही, माझ्या घराकडे दुर्लक्ष करुन मी औरंगाबादकरांसाठी काम केलं. मात्र, असं कोणतं वाईट काम मी केलं ज्यामुळे तुम्ही माझा पराभव केला. हा पराभव पाहण्याआधी मी मेलो का नाही. हर्षवर्धन जाधव यांच्यावरही ते भडकले. हर्षवर्धन जाधवांनी आपल्या आई-वडीलांची, वहिनीची हत्या केली. स्वतःच्या बायकोला अनेकदा मारहाण केली, असे आरोप यावेळी खैरे यांनी जाहीररित्या केले.