धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात राजाभाऊ फड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली असता हायकोर्टाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. हायकोर्टाने तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेवरही ताशेरे ओढले आहेत.

Review