शहराचा विकास आणि झोपडपट्टी भकास हि कसली स्मार्ट सिटी - सामाजिक कार्यकर्ते सिद्दीक शेख यांचा सवाल
पिंपरी ( सह्याद्री बुलेटिन ) - पिंपरी चिंचवडमध्ये एका बाजूला प्रचंड विकास दाखवून स्मार्ट सिटी ची स्वप्न पाहणाऱ्या शासन आणि प्रशासनाला झोपडपट्ट्यांचा भकासपणा दिसत नाही का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सिद्दीक शेख यांनी केला आहे. या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवार ( दिनांक २९ ) रोजी वाजता ड प्रभाग कार्यालयावर बेधडक आयोजन आले आहे.
वाकडमधील ,अण्णाभाऊ साठे नगर ,म्हातोबानगर ,काळाखडक झोपडपट्यांमध्ये नागरिक अत्यन्त हलाखीचे जीवन जगत आहेत. एकीकडे वाकडमध्ये टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या ,परंतु झोपडपट्या आहे त्याच अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांचे आर्थिक ,सामाजिक , शैक्षणिक जीवनमान खालावलेले आहे.
अपना वतन संघटनेच्या माध्यमातून या कष्टकरी ,गोर-गरीब ,दुर्बल ,वंचित व लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाने दुर्लक्षित केलेल्या जनतेला त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी, वाकडमधील ,अण्णाभाऊ साठे नगर ,म्हातोबानगर ,काळाखडक झोपडपट्यांमध्ये नागरी सुविधा , मालकी हक्क व पुनर्वसनाच्या मागणीसाठी बेधडक मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील होऊन प्रशासनाला जाब विचारण्याचे आवाहन अपना वतन संघटना अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी केले आहे.