काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट आणखी सहा महिन्यांसाठी वाढविण्याचा प्रस्ताव
काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट आणखी सहा महिन्यांसाठी वाढविण्याचा प्रस्ताव अमित शहा यांनी सभागृहात सादर केला. या चर्चेदरम्यान अमित शहा म्हणाले की, जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये कोणताही पक्ष सत्ता स्थापन करण्याचा दावा करत नव्हते तेव्हा राज्यपाल राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर तेथील विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला. 9 सप्टेंबर 2018 रोजी राज्यपाल राजवटीचा कालावधी संपल्यानंतर त्याठिकाणी कलम 356 चा वापर करत 20 सप्टेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2 जुलै रोजी हा सहा महिन्याचा अवधी संपत असून आणखी 6 महिन्यासाठी राष्ट्रपती राजवट सुरु ठेवण्याचा प्रस्ताव मांडला गेला.