महानगरपालिका घरोघरी कचरा गोळा करणार - महापौर जाधव आणि मडिगेरी यांनी केला शुभारंभ

पिंपरी - (सह्याद्री बुलेटिन ) - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये घरोघरचा कचरा गोळा करणे आणि त्याची वाहतूक करण्याच्या कामाचे उदघाटन कृष्णानगर, फ प्रभाग या
ठिकाणी महापौर राहुल जाधव यांचे हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी,आयुक्त श्रावण हर्डीकर,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे,
सहा.आयुक्त मनोज लोणकर, आणि मे.बी.व्ही.जी. संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थितीत होते. तसेच महानगरपालिकेच्या ८ क्षेत्रिय कार्यालयातील ३२ प्रभागामध्ये स्थानिक नगरसेवकांच्या शुभहस्ते कामाचे उदघाटन करणेत आले आहेत.

पालिकेची यापुर्वीची वाहने जुनी असल्याने कचरा वाहतुक करतांना वारंवार बंद पडत होती.
त्यामुळे कचरा गोळा करणे आणि वाहतुक करणेचे कामास अडथळा निर्माण होत होता. आता
दोन्ही संस्थांनी नविन वाहने घेऊन घरोघरचा कचरा गोळा करणे व वाहतुक करण्याच्या कामास
सुरुवात केली आहे. तसेच दोन्ही संस्थांनी बहुतांशी जुन्या कामगारांना याकामात समाविष्ट
केले आहे.या कामामुळे स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत पिंपरी चिंचवड
महानगरपालिकेच्या नामांकनात १०० टक्के वाढ होईल अशी खात्री महापौर राहुल जाधव आणि स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी व्यक्त केली.

Review