सजी वर्की एक निष्ठावंत आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व - सचिन साठे
पिंपरी ( सह्याद्री बुलेटिन ) - सजी वर्की हे प्रामाणिक आणि निष्ठावंत व्यक्तिमत्व असून तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले आहे.
सजी वर्की यांच्या जन्मदिनानिमित्ताने ते बोलत होते.
एका सामान्य कुटुंबातील हा कार्यकर्ता सुपर वायझर सारखी कामे करत शिक्षण पूर्ण करतो, प्रतिकूल परिस्थितीवर मत करत संघर्ष करतो आणि एक यशस्वी उद्योजक होतो. हा प्रवास सर्वानाच पथ दर्शक आहे.
काँग्रेस पक्षावर असणारी निष्ठा, कार्यातील प्रामाणिकपणा, सर्वांशी आपुलकीचे नाते, संघर्षाची तत्परता यामुळे वर्की यांचे वेगळेपण सिद्ध होते, असेही साठे म्हणाले
