“आत्म्याशी एकरूप होणे म्हणजे योग” - प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड

पिंपरी (सह्याद्री बुलेटिन प्रवीण डोळस ) - ‘मन शांत करून आत्म्याशी एकरूप होण्याची क्रिया म्हणजे योग’ आजच्या धक्का-धक्कीच्या जीवनात व्यक्तिला स्वत: च्याच आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे अनेक गंभीर आजार उद्भवतात. तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते, म्हणून प्रत्येकाने जाणीवपूर्वक स्वत:च्या आरोग्यासाठी रोज योगासने केली पाहिजेत. योगासनामुळे मन शांत राहून आरोग्य सुधारते’ असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयात ते बोलत होते.

महाविद्यालयाच्या क्रीडा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी यांनी योग प्रात्यक्षिके केली. क्रीडा विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग लोहोटे , श्रीमती कल्पना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिके करण्यात आली. ताडासन, भुजंगासन, त्रिकोणासण इ. योगासनानंतर कपालभाती, अनुलोम-विलोम, प्राणायाम या योगक्रिया करण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी तीनही विभागाचे उपप्राचार्य प्रा. मृणालिनी शेखर, डॉ. प्रमोद बोत्रे, प्रा. संजीवनी पाटील उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ. पांडुरंग लोहोटे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. शुभदा लोंढे, डॉ. मिलिंद भंडारे, प्रा. विद्यासागर वाघेरे यांनी केले.

Review