रिक्षाचालकांच्या प्रलंबित मागण्यासाठी आर टी ओ कार्यालयासमोर आंदोलन
पुणे ( सह्याद्री बुलेटिन ) - परवाना खुल्या पद्धतीने देणे बंद करावा ,रिक्षा भाडेवाढ करण्यात यावी ,विम्याचा हप्ता कमी करावा ,रिक्षा पासींग मधील अडचणी दूर कराव्या ,कॅब कंपन्यांच्या बेकायदा वाहतुकीवर कारवाई करण्यात यावी ,रिक्षा चालक कल्याणकारक मंडळ स्वतंत्र व अभ्यास समितीने सुचवल्याप्रमाणे करावे अशा विविध मागण्याकरिता रिक्षा पंचायत व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडी पुणे शहर यांच्या वतीने पुणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय याठिकाणी आंदोलन करण्यात आले.
यावेळी आर पी आय वाहतूक आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजीज शेख यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक आघाडी पुणे शहर अध्यक्ष वैभव पवार , उपाध्यक्ष आकाश भोसले , हुजेफ़ सय्यद यांनी आर टी ओ अधिकारी विनोद तगडे व संजय भोर याना निवेदन देण्यात आले. यावेळी मन्सूर शेख ,हर्ष पवार ,आकाश रेड्डी ,रोहित गायकवाड , आदित्य कोडगे , आशिष भोसले आदी उपस्थित होते .