मुंबईतील इमारत खेकड्यांनी पाडली हे सांगून टाका, अजित पवारांचा सरकारला टोला
पिंपरी ( सहयाद्री बुलेटिन ) - मुंबईतल्या डोंगरी भागात असलेली केसरबाई इमारत खेकड्यांनी पाडली असे सरकारने जाहीर करून टाकावे असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटलं असं वक्तव्य जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं त्याचाच संदर्भ घेत अजित पवारांनी आता डोंगरी इमारत दुर्घटनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा टोला लगावला आहे.
मुंबईतल्या डोंगरी भागात असलेली केसरबाई इमारत कोसळून १३ जण ठार झाले आहेत. ही इमारत शंभर वर्षे जुनी होती. या इमारतीत १० ते १५ कुटुंबं रहात होती. या सगळ्यांवरच काळाने घाला घातला. इमारत मोडकळीला आली होती तिच्या दुरूस्तीचे काम विकासकाकडे दिले होते तर ते पूर्ण का करण्यात आले नाही? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला गेला. आता अजित पवार यांनीही ही इमारत खेकड्यांनी पाडली असे सांगून टाका असे म्हणत सरकाला टोला लगावला आहे.
डोंगरी भागात मुंबईमध्ये तर सारख्या इमारती पडत आहेत. अनेक नागरीक मृत्युमुखी पडत आहेत. अनेकांचे जीव जात आहेत, तरी देखील हे सरकार कठोर निर्णय घेत नाहीत. मध्यंतरी तिवरे धरण फुटलं हे खुशाल सांगतात खेकड्यांनी धरण फोडले आहे. ‘ खेकड्यांचा जीव केवढा धरण केवढं’ किती खोटं बोलावं आता तर डोंगरी परिसरातील इमारत खेकड्यांनी पडली आहे का? असा प्रश्न वेळ नागरिकांवर आली आहे.