एकता ड्रायव्हर ग्रुपच्यावतीने,कळंबोली वाहतूक पोलिसांना रेनकोट वाटप

नवी मुंबई (सह्याद्री बुलेटीन)  प्रविण डोळस - ऊन, पाऊस, थंडीची तमा न बाळगता दिवस रात्र वाहतुकीचे नियोजन, व्यवस्थापन करणारे आणि नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी तत्पर असलेल्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकता ड्रायव्हर ग्रुप असोसिएशन(म.राज्य),पोलिसांना रेनसूट देण्यात आले.

पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर यांनी ड्रायव्हर्सना विविध समस्यांवर चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केले आणि सहायक पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या समवेत पोलीस कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष-सुधाकर सूर्यवंशी, उपाध्यक्ष-दामोदर गायकवाड, सचिव-राहुल समिंदर,कार्याध्यक्ष-दिपक ठाकूर, सल्लागार-संतोष कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.

Review