आकुर्डीतील रमाई नगर येथील बोधिसत्व बुद्ध विहारात गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप...

पिंपरी ( सह्याद्री बुलेटिन - प्रविण डोळस ) - भारत देश महासत्ता होण्यासाठी शिक्षणाचा सूर्य देशातील शेवटच्या झोपड़ी पर्यंत पोहचला पाहिजे हे ध्येय साध्य करण्यासाठी अनेक देश बांधव आपापल्या परीने कार्य करीत आहेत. याच कार्याचा वसा घेऊन दि. २८ जूलै रोजी (आकुर्डी प्राधिकरण ) येथील तक्षशिला बुद्ध विहार मधील सदस्यानी,आकुर्डी रमाई नगर येथील बोधिसत्व बुद्ध विहार येथे १२८ गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. 

या वेळी अर्पना शिंदे, प्रा.नम्रता आल्हाट,यशवंत भालेराव,आशा बैसान, सागर कदम, सुनील तायडे, संगीता शेळके, गौतम जाधव यांनी "शिक्षणाचे महत्व" या विषया वर मुलाना मार्गदर्शन केले.तर या कार्यक्रमाला बाळासाहेब कांबळे, संतोष ऊणवने, रवि कांबळे, दीपक ओव्हाळ, कंशप ठमके, सुदेश जगताप, म्हस्के साहेब आदी उपस्थित होते. 

Review