विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, २१ ऑगस्टला विरोधकांचा मोर्चा...

लोकसभेत दाणादाण उडालेले सर्व पक्ष एकत्र येऊन ईव्हीएमला विरोध सुरु केला आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली गेली पाहिजे अशी मागणीहि करण्यात येत आहे. 
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यांच्या वतीने भूमिका मांडली आणि या साठी ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्ट रोजी आम्ही मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले,

 ३७१ मतदारसंघांमध्ये घोळ आहे, ५४ लाख मतांचा गोंधळ आहे असा आरोप करत, या मोर्चात एकाही पक्षाचा झेंडा नसेल. लोकांचं म्हणणं काय आहे? ते आम्ही मांडणार आहोत असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

स्वाभिमानीचे राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे अजित पवार आणि छगन भुजबळ यांची या पत्रकार परिषदेला हजेरी होती. 

 

Review