कन्या विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
पिंपरी (सह्याद्री बुलेटिन - प्रविण डोळस ) - पिंपरी येथील कन्या विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.
मुख्याध्यापिका एस. एस. पडवळ आणि पर्यवेक्षिका यू. बी.पाटील यांनी प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
विद्यार्थिनींनी लोकमान्य आणि लोकशाहीर या दोन महान व्यक्तींबद्दलची मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे नियोजन एस.आर.गीते व एस. पी. दोरगे यांनी केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून भोईटे यांनी मार्गदर्शन केले.
एस. व्ही. धामणे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.