एकाच दिवसात होणार उद्योगनगरीचे दर्शन, पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवेचे रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी ( सह्याद्री बुलेटिन ) - पुणे दर्शन या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहर दर्शन सेवा शनिवार ( दि. ३ ) पासून सुरु झाली असून निगडी येथे या बसचे लोकार्पण राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला अविनाश महातेकर, महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना शहराचा इतिहास समजावा, यासाठी पीएमपीने ही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेसाठी सुरुवातीला पीएमपी प्रशासनाने दोन वातानुकूलित (एसी) बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याची आसन क्षमता ३२ इतकी असेल. पहिल्या टप्प्यात उपनगरातील दोन मार्गांवरून या बस धावणार आहेत. सकाळी नऊला निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक आणि भोसरी चौकातून या बस सुटणार आहेत. यामध्ये तीर्थक्षेत्र देहू व आळंदीचादेखील समावेश करण्यात आला आहे.