
सध्या काश्मीरमध्ये काय चाललंय ? अब्दुल्ला, मुक्ती नजर कैदेत...
काश्मीरमध्ये सध्या काय चाललंय हा चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय झाला आहे. अमरनाथ यात्रा रद्द झाली.पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं, सर्वत्र सैन्यदल तैनात करण्यात आले, काश्मीरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. सध्या जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद आहे.
रविवारी रात्रीपासून काश्मीरमधील हालचालींना वेग आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृह सचिव यांच्यासमावेत गुप्तचर खात्याचे अधिकारीही उपस्थित होते. संपूर्ण परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला जात आहे.
लवकरच या सर्वांची माहिती सरकार संसदेत दिली जाणार आहे.