मॉर्डन कॉलेजच्या माजी विद्यार्थांनी साजरा केला "फ्रेंडशिप डे"
पुणे ( सह्याद्री बुलेटिन - दत्ता सोनवणे ) - शिवाजीनगर येथील मॉर्डन कॉलेजच्या माजी विद्यार्थांनी "फ्रेंडशिप डे" च्या निमित्ताने एकत्र येऊन एक अविस्मरणीय सोहळा साजरा केला. कॉलेज नंतर तब्बल १० वर्षानंतर हे माजी विदयार्थी एकत्र आले होते.
मैत्रीला कोणत्या दिवसाची गरज नसते पण धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण स्वतः साठी सुद्धा वेळ काढत नाही आणि जगतो केवळ व्यवहार म्हणूनच... यामुळे किमान "फ्रेंडशिप डे" च्या निमित्ताने का होईना एकत्र येऊन काही काळ व्यवहार विसरून जीवन जगले पाहिजे, याच संकल्पनेतून हा नवीन ट्रेंड निर्माण होतोय आणि त्याला प्रतिसादही मिळतोय.
.jpg?1564932891610)
शिक्षण पूर्ण होऊन स्वतःचे करिअर करताना पुन्हा एकदा आपल्या मैत्रीला उजाळा मिळावा या उद्देशाने निलेश लोंढे या माजी विद्यार्थ्याने तब्बल दहा वर्षांपूर्वी शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा डेटा जमा केला. स्नेहल आणि इतर साथीदारांनी साथ दिली आणि यातून हा "फ्रेंडशिप डे" साजरा करण्यात आला.
यावेळी संदीप गायकवाड, पांडुरंग फलके, राज गायकवाड, महेश कुंभार, धम्मरत्न डांगे, राहुल काशीद, सतीश टिंगरे, राहुल फंड, अभिरेखा मोरे, जोती गायकवाड, भारती आहेर, वर्षा कांबळे, रीना काळजे, विशाल जाधव, संदेश गायकवाड, स्नेहल मुळुक, आलोक औंधकर, अर्चना पिंगळे, सागर कुलकर्णी, आम्रपाली कांबळे यांच्यासह अनेक माजी विदयार्थी उपस्तित होते.
.jpg?1564932953935)