अफ़वावर विश्वास न ठेवता सतर्क राहावे - मंचरकरांचे नागरिकांना आवाहन

पिंपरी - शहरात झालेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे विस्कळीत जनजीवन यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, यावेळी कोणत्याही अफवाना बळी न पडता नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन नगरसेविका गीता मंचरकर आणि सामाजिक कार्यकर्ते सुशील मंचरकर यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड परिसरात अतिवृष्टी सुरू असून मागील चोवीस तासात ९०० मिमि पेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे, यामुळे नद्यांची पातळी वाढून पूर आले आहेत , यामुळे नदी किनारी असलेल्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

या काळात अनेकदा अफवा पसरविण्याचे प्रयत्न समाज कंटक करतात त्यावर विश्वास न ठेवता पालिकेशी संपर्क करावा आणि कोणतीही अडचण असल्यास नगरसेविका गीता मंचरकर यांच्या कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन श्री व सौ मंचरकर यांनी केले आहे. 

Review