सुषमा स्वराज यांना मान्यवरांची श्रद्धांजली
माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं वयाच्या ६७ व्या वर्षी एम्स रुग्णालयात निधन झालं.
स्वराज यांनी केलेले शेवटचे ट्विट - प्रधान मंत्री जी - आपका हार्दिक अभिनन्दन. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी.
त्यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली
सुषमा स्वराज या सार्वजनिक आयुष्यात स्वाभिमानी, साहसी आणि प्रामाणिकतेच्या प्रतिक होत्या. नेहमीच अडल्या-नडल्यांना मदतीसाठी तयार असायच्या. मदतीसाठी नेहमी तत्पर असणारं नेतृत्व देश नेहमीच आठणीत ठेवेल - राष्ट्रपती रामनाथ कोविंद
देशासाठी केलेल्या कार्यामुळे त्या सदैव स्मरणात राहतील - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सुषमा स्वराज यांनी त्यांचा स्वभाव आणि वागण्यामुळे भारतीय राजकारणात एक आदर्श महिला नेतृत्व तयार केलं होतं. आणीबाणीच्या काळानंतर त्यांचे नेतृत्व उभारु लागलं. भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून पक्षाच्या विस्तारामध्ये त्यांचे मोठं योगदान राहिलं आहे. त्यांच्या जाण्याने देशाचं, पक्षाचं आणि माझं वैयक्तिक नुकसान झाल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
भारतीय राजकारणातील एक खंबीर नेतृत्व
माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक झंझावाती आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व हरपले आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या. संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! - शरद पवार
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. सुषमाजी यांच्या जाण्याने अभ्यासू, कर्तृत्ववान नेतृत्व देशाने गमावले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.- सुप्रिया सुळे