भाजपची रणरागिणी अनंतात विलीन, मुलीनेच दिला मुखाग्नी...
दिल्ली ( सह्याद्री बुलेटिन ) - भाजपाची रणरागिणी सुषमा स्वराज यांच्यावर दिल्लीतील लोधी स्मशानभूमीतील विद्युत शवदाहिनीत कन्या बांसुरी यांनी अंत्यसंस्कार केला.
यावेळी कुटुंबियांबरोबरच राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी तसेच मंत्री मंडळातील बहुतेक मंत्री, विरोधिं आणि सत्ताधारी सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्तित होते.
मंगळवारी रात्री हृदयविकाराने सुषमा स्वराज (६७) यांचे दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले होते. भाजपसह सर्व देशात याबद्दल दुःख व्यक्त होत आहे.