स्वकुळ साळी समाजाच्या वतीने जागतिक विणकर दिन साजरा.
निगडी(सह्याद्री बुलेटिन)- पिपरी चिंचवड, देहूरोड व तळेगाव परिसरातील स्वकुळ साळी समाजाच्या वतीने श्री भगवान जिव्हेश्रर मंदिर परिसरातील, रामचंद्र दळवी सभागृहात जागतिक विणकर दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी समाजाचे अध्यक्ष नाथाभाऊ मानकर होते, यांच्या हस्ते श्री भगवान जिव्हेश्रराच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी जागतीक विणकर दिनानिमित्त माहिती सांगुन, मनोगत व्यक्त करून,समाज बांधवांना विनकर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी ज्येष्ठ सल्लागार वसंतराव नगरकर, विभाग प्रमुख पद्माकर जांभळे,सचिव कृष्णा कांबळे,खजिनदार दिलीप बिडकर,सचिव प्रभाकर अष्टेकर , शिवानंद धोत्रे, महेश जयदेवकर, उमेश मढेॅकर, शकुंतला अष्टेकर ,गितेश्र्वर भागवत व स्वकुळ साळी समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.