वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देण्यापेक्षा पूरग्रस्तांसाठी आवश्यक साहित्य द्या - विरोधी पक्षनेते नाना काटे यांचे आवाहन

पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) - विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा १५ ऑगस्टला जन्मदिवस असतो त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम केले जातात. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अनेक ठिकाणी उत्सव केला जातो, यावेळीतर नाना काटे विरोधी पक्षनेते असल्याने हा जन्मदिवस सर्वत्र साजरा केला जाणार होता पण महाराष्ट्रात झालेला पाऊस, आलेला पुर, झालेली जीवित व वित्त हानी यामुळे आपला वाढदिवस सध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय नाना काटे यांनी घेतला असून पुष्पगुच्छ, भेटवस्तू किंवा इतर कोणतीही भेट देण्यापेक्षा पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देण्यापेक्षा पूरग्रस्तांसाठी आवश्यक साहित्य द्या - विरोधी पक्षनेते नाना काटे यांचे आवाहन 

सांगली आणि कोल्हापूर भागात पावसाने थैमान घातले आहे , अनेकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. भांडी-कुंडी वाहून गेली आहेत. तेथील बांधवांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, जरी गाव आपले नसले तरी ती माणसे आपली आहेत. म्हणून मी आवाहन करतो कि,माझ्या वाढदिवसाला आपण पुष्पगुच्छ, केक व इतर भेटवस्तू न आणता त्या ऐवजी आपल्या स्व इच्छेने पूरग्रस्त बांधवांना लागणाऱ्या जीवनावश्यक आणि विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू आणाव्यात, या वस्तू त्या पुरग्रस्तांपर्यंत पोहचविण्यात येतील, असे आवाहन काटे यांनी जनतेला आणि कार्यकर्त्यांना केले आहे. 

Review