बाबराच्या वंशजांची राममंदिराची मागणी, पहिली सोन्याची विट देण्याची तयारी...

आयोध्येत राम मंदिर बांधण्यात यावे, या बांधकामाची पहिली वीट आमच्या परिवाराकडून ठेवली जाईल. शिवाय राम मंदिर बांधायला सोन्याची वीट दान देऊ असे विधान मुघल बादशहा बहादूर शाह जफर यांचे वंशज हबीबुद्दीन तुसी यांनी केले आहे.

कोणाकडेही अयोध्येतील त्या वादग्रस्त जागेच्या मालकीची कागदपत्रे नाहीत. पण मुघल शासकांचा वंशज या नात्याने ती जमीन कोणाला दिली जावी याविषयी मत व्यक्त करण्याचा हक्क तरी मला नक्कीच आहे. कोर्टाने जर मला तसी परवाणगी दिली तर अयोध्येतील सर्व वादग्रस्त जमीन मी राम मंदिर बांधण्यासाठी परत देईन, रामाचे जन्मस्थान असल्याचा दावा करणाऱ्यांच्या भावनांचा आदर करायला हवा असेही तुसी म्हणाले आहेत. 

Review