भाजपाला आणि देशाला दुसरा दुःखद धक्का, अरूण जेटली यांचं निधन

भाजपच्या जेष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर आज भाजपाला आणि देशाला दुसरा दुःखद धक्का बसला आहे, माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचं आज निधन झालं. ते 66 वर्षांचे होते.
 
 9 ऑगस्टपासून त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने जेटली यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची आज प्राणज्योत मालवली.

18 महिन्यांपासून ते आजारी होते यामुळे मोदी २  सरकारमध्ये न जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. जेटली यांच्या जाण्याने देशात पुन्हा एकदा दुःखाचे सावट पसरले असून राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी दुःख व्यक्त केले आहे.

Review