कन्या विद्यालयात शाडूचे गणपती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन

पिंपरी (सह्याद्री बुलेटिन -प्रवीण डोळस ) - 'पर्यावरणपूरक गणपती बनविणे आणि विध्यार्थी जागृती करणे यासाठी बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2019 रोजी कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे मध्ये शाडूचा गणपती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये इयत्ता पाचवी, सहावी,आठवी या गुरुकुल वर्गातील विद्यार्थिनींनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.
अतिशय सुंदर आणि आकर्षक मूर्ती बनविण्याचा प्रयत्न केला.स्वनिर्मितीचा आनंद विद्यार्थिनींच्या  चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता. 
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पडवळ एस एस आणि पर्यवेक्षिका पाटील यु बी यांनी प्रेरणा दिली आणि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले.

Review