पिंपरी मतदारसंघ रिपब्लिकन पार्टीलाच देण्यात यावा- वाहतूक आघाडीची पालकमंत्र्यांना मागणी
पिंपरी मतदारसंघ आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना व इतर मित्र पक्षांच्या युती मध्ये सामील असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मिळावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडी चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अजीज शेख,उपाध्यक्ष संतोष गायसमुद्रे,कार्याध्यक्ष सुनील गंगावणे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना केली आहे .
पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीं साठी राखीव असून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवार चंद्रकांत सोनकांबळे मोठ्या प्रमाणात जनाधार मिळवला होता आणि यावेळी पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि नेते कार्यप्रवण झाले असून ही जागा पक्षासाठी जिंकण्याचा निर्धार केला आहे. यामुळे पिंपरी रिपब्लिकनला मिळावी अशी विनंती वाहतूक आघाडीने केली आहे.